पहीलं प्रेम
पहीलं प्रेम
आज पाहता क्षणी तुला ...
आला आठवणींना ओलावा...
तारुण्यातला तु... अन् वृद्धापकाळातला तु....
तु तुच आहेस का रे....
की.. मी बदलले... सांग ना...
एकमेकांची वाट पाहत...
बसणारे आपण...
अन् क्षणात परकेपणाची ...
जाणीव करणारे आपण...
पण , हा... एकमेकांच्या विचारांचा ही
स्विकार करणारे आपण...
आणि महत्वाचं म्हणजे ...
आई वडिलांच्या ईच्छा खातर ...
दुर ... विभक्त... होऊन .. प्रेमाचा त्याग करणारे आपण...
पण आजही .. प्रत्येक भेटीला... आतुरलेले आपण...
ते दडपण आहे... तो हव्यास ही आहे...
आता ही ओढ आहे... त्या तारुण्या पलिकडची...
तेच प्रेम... तु जर दिले .. आजही...
समाजाला डावलुन...
तर मी ही नक्कीच स्विकारेल...
नाहीतर आल्या पावली निघुन जाईल...
वास्तविकेतला तु बदललेला असलास ना...
पण.. पण .. माझ्या आठवणीतला तु आणि तुच राहशील...
