फाटलेली जिंदगी
फाटलेली जिंदगी
पाठीवर आहे माझ्या
उभ्या घराचा तो भार
तरी बाहेरून होती
संकटाचे किती वार
ऊन वारा पावसाचा
झेलतोय मी आघात
लाचारीचे जीवन हे
जगतोय या जगात
भूक अन् तहानेला
कधीचाच विसरलो
भावी जीवनाचे स्वप्न
अंतर्मनी ते स्मरलो
अवकाळी पावसाने
होते नासाडी पिकाची
अति यातना भोगतो
वर्णी लागली दुःखाची
हतबल हातास मी
झालो आज रे या क्षणी
फाटलेली ही जिंदगी
फिरतोय रानोवनी
शेतकरी नाव माझे
झाले जीवन बेजार
आत्महत्या शिवाय रे
काय हाती उरणार
