पहाट वारा
पहाट वारा
रम्य प्रभाती
वाहतो धुंद जरा
पहाट वारा
घालितो शीळ
रानी पहाट वारा
वाहे भरारा
पहाट वारा
खोडकर जरासा
तरी हवासा
पहाट वारा
गातो मंजुळ गाणे
धुंद तराणे
खट्याळ जरी
सखा उषेचा खरा
पहाट वारा
पहाट वारा
देई उत्साह नवा
सर्वांना हवा
पहाट वारा
कुंतल उडवितो
मला छेडितो
पहाट वारा
भारीच अवखळ
सदा जवळ
