STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

पेरणी

पेरणी

1 min
307

झालं शिवार तयार, बी मातीत रुजलं

काळ्या आईच्या खुशीत आनंदाने ते हसलं


पेरणी होताच मेघाचंही आगमन झालं

पाऊस पडताच बळीराजाला थोडं समाधान वाटलं  


धरणी मायेच्या कुशीत बियांना आता कोंब फुटलं 

नाजुक हिरवेगार टोक हे प्रकाशाकडे सुटलं  


शेतातील बहरलेलं रोप आता

वाऱ्यासंगे ताल धरू लागलं

बळीराजाच्या कष्टाचं थोडं का होईना सोनं झालं


पेरणीच्या निमित्ताने आशेचा किरण दिसायला लागला

सर्वत्र भरभराट व आनंद असू दे


असाच बरस रे घना धरा कर ही ओलीचिंब 

शेतीसाठी मिळो भरपूर पाणी नदी तलाव भरो तुडुंब 

मेघराजाला बळीराजाने साकड घातलं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational