पावसाचे प्रश्न
पावसाचे प्रश्न
पावसावर काय लिहु?
अराजकतेची वादळ हेलावून टाकत आहेत
पहाता पहाता डोळ्यादेखत पेटत आहेत
सत्याच्या हजारो चिता माणूस होरपळून चाललाय
कोणिच कोणाचा उद्धार कर्ता उरला नाही
होय! लांडगे आपापसात गुरगुरत आहेत
गुपचुप पहात रहा षंढासारखे किमान इमान शाबुत राहील
उसळलेल्या रक्ताला नोटांची थंड हवा गर्भगळीत करतेय
गळुन पडतात भलेभले अंगार जेव्हा पैशाची होते बरसात
पावसावर किती नी काय लिहु !!
अस व्हायचं पुर्वी जखमेवर मीठ ,
जसे बोचतात थेंब आता
प्रश्न घेऊन येतो पाऊस,
अनाधिकृत बांधकामाखाली दडवलेलया
ओढयांचा बांध तुटला तर?
मानवाच्या अतिक्रमणाने,
हैराण नदीचा विस्फोट झाला तर?
महिन्यापूर्वीच चकचकणारया काळ्याकुट्ट डांबराने
कात टाकुन पांढर्या खादीचे काळे कर्म कुण्या निष्पाप जीवाचा
खड्ड्यात गेलेल्या जीवासह ऊघडकीस आणले तर?
गुढगाभर चिखल पार करून गळक्या वर्गातले पाणी
ऊपसणारे विद्यार्थी ही आहेत या डिजीटल इंडीयात ,
गरीबाची झोपडी, शेतकरयाचे पीकं,
आणि हो नुकताच करोडो रूपयांचे सजलेल्या कुण्या
राष्ट्रीय महामार्गावरील चकमकीत
पुलाखाली वस्ती केलेली कुटुंब दबली तर
नसतील ना?सरकारच्या इनक्रेडीबल
इंडियाच्या उदात्त धोरणामध्ये
कीती प्रश्न घेऊन येतो हल्ली पाऊस
दूनियादारीचे काळेकुट्ट ढग पांघरून जगताना
वेदनामयी वास्तवाशी,
भिडण्याचे भान ही देतो पाऊस..
