पावसाचा खेळ न्यारा
पावसाचा खेळ न्यारा
घ्यावा पाहून दरारा पावसाचा खेळ न्यारा
सरीवर येति सरी त्यात भिजतोय वारा
हळूहळू वाढे वेग पहा वाहतोय झरा
करी तांडव क्षणात चार हात लांब बरा
कोसळतो महाकाय नाद घुमतोय खरा
लुटा आनंद डोळ्यांनी निसर्गाचा मेळ सारा
डोले पाती गवताची ओली चिंब झाली धरा
कसा लपला वरूण थंडावला त्याचा पारा
शेतकरी दमलेला डोक्यावर त्याच्या भारा
जनतेचा तो पोशिंदा त्याच्या शेतात पसारा
