पावसा
पावसा
येरे येरे पावसा
अंग माझे भिजू दे
तुझ्या सरींसोबत
मला खेळू दे
वाटेतल्या डबक्यात
पाणी साचू दे
बेडकांचा डराव
मला ऐकू दे
सवंगडी माझे
जमतील सारे
भरवून कपडे
मस्ती करतील सारे
खळखळ पाणी
आज वाहू दे
नदीला पूर येऊन
शाळेला सुट्टी मिळू दे
ताप येईल म्हणून
आई... नको ओरडू
पाण्यात खेळायला
जाण्या... नको थांबवू
