पाऊस
पाऊस
खूष शेतकरी । थेंब पडताना ।
अंकुरे शेतांना । तो पाऊस ॥ १ ॥
मन ते अशांत । होतसे ते शांत ।
कानी रुंजवत । तो पाऊस ॥ २ ॥
तप्त तो उन्हाळा । बदल क्षणात।
कस्तुरी श्वासात । तो पाऊस ॥ ३ ॥
हात तो हातात । ओलावा बंधात ।
चिंब ओघळत । तो पाऊस ॥ ४ ॥
किशोर पाहतो । नवाच भासतो ।
स्मरणी राहतो । तो पाऊस ॥ ५ ॥
