पाऊस
पाऊस
निशब्द पायवाटांवरचा
चुकार पाऊस
कफल्लक वळणांवरचा
अमीर पाऊस !
गोड़ गळ्यांतून
गाणारा पाऊस
लाल ओठांतून
हसणारा पाऊस !
खुल्या दिलाचा
मोकळा पाऊस
हळव्या डोळ्यातला
भोळा पाऊस !
रित्या करांतला
खुळा पाऊस
मनास लावणारा
लळा पाऊस !
हिरव्या पानांतला
भन्नाट पाऊस
खामोश रातीत
सन्नाट पाऊस !
बोलता बोलता
मूक होणारा पाऊस
मूक मूक होताना
बोलणारा पाऊस !
