पाऊस
पाऊस
1 min
21
(पंचाक्षरी रचना)
पर्जन्य राजा
वाजवी बाजा
कोसळे धारा
उत्साह ताजा......१
पाऊस धारा
वाऱ्याचा मारा
लागे अंगाला
टपके गारा........२
अवनी न्हाली
प्रसन्न झाली
सुखदायक
थंडी ही आली.......३
कोंब फुटले
बी उगवले
शेत शिवार
ते बहरले......४
धरा नटली
शालू नेसली
नवयुवती
अशी सजली.......५