पाऊस
पाऊस
पावसा तू आम्हाला खूप काही
देतोस रे,,,
मग
तू आमच्याकडून काहीच का नाही मागत
तू येतोस काही महिने
आणि
पूर्ण वर्षाची भरती करून जातोस
एका बियाला रोप करून
वृक्ष तू बनवतोस,,,
झाडांना फळ देतोस
वेलींना फुल देतोस
माणसाला आयुष्यात देतोस
नात्यांना आठवणी देतोस
अगणित देऊन रिकामे
हाती वापस जातोस,,,
