पाऊस
पाऊस
पाऊस। एक खट्याळ मूल
पाऊस। एक अल्लड वल्ली
रुसतो तेव्हा बरसायचंच थांबतो
खूश होतो तेव्हा धोधो बरसतो
हा, पण रागावतो तेव्हा हाहाकार माजवतो
हा पाऊस ना अगदी असाच नाठाळ आहे
प्रेमीजनांना लाडिक शीळ घालतो
तर कष्टकर्यांना घामाने भिजवतो
पण तरीही तो सर्वाना हवाहवासा आहे
त्याशिवाय का सृष्टी त्याच्यावर फिदा आहे
प्रियकराची तो प्रेयसी आहे
शेतकऱ्यांचा तो दाता आहे
मुलाबाळाचा
आणि लाडका पावसा पावसा आहे
आणि आम्हा सर्वांचा लाडका वसंत। आहे
