STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Classics Inspirational Others

3  

Shivani Hanegaonkar

Classics Inspirational Others

एक घर

एक घर

1 min
212

एक घर दगडाच

जुन्या कोरीव विटांच

सोप्याच अन पडवीच

बहरलेल्या अंगणाच

अंगणापुढल्या तुळशीच

घडवंचीवरच्या कळशीच

एक घर........


एक घर माणसांच

दादाच्या खट्याळ हसण्याच

ताईच्या खोट्या रूसण्याच

आजोबांच्या कडक शिस्तीच

आजीच्या गोड गोष्टीच

आईच्या अथांग मायेच

बाबांच्या खंबीर छायेच

एक घर..........



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics