माझी कविता
माझी कविता
माझी कविता जन्माला आली
शब्दांच्या मधुर जुळव निने
सादर करण्याची हिंमत मिळाली
ती बहिणाबाई ने
शब्दांच्या सरळ रचनेत गुंफण असते
जुळते ती कविता त्यात म धुरता असते
सुर गोड, काव्य असते मधुर
गुंफले त्यात असते, प्रेम, वीरता, शौर्य असते
माझी कविता, पहिली त्यात आहे
सुरवात माझ्याच प्रेमाची
जुळवाजुळव केली शब्दांची
पण सत्यता आहे त्यात माझ्या प्रेमाची
धडपडत, पडत झडत तयार केली
माझी कविता, अन उभी केली
पण या लेखनीने मला
जुळवणे शब्दांची शिकवि लि
नाही जमत मला काव्यरचना
जुळवणी शिकवले शब्दांनी
या शब्दांची वया लेखणीची
राहील मी नेहमी अनंत रूनी
