STORYMIRROR

MINAKSHI THOMBARE

Inspirational

3  

MINAKSHI THOMBARE

Inspirational

शब्द अमृताचे बोल

शब्द अमृताचे बोल

1 min
198


शब्द अमृताचे बोल

शब्द हे पृथ्वीचे मोल

शब्द हे असे अनमोल

बोलण्या आधी ते तोल....!!1!!....


शब्द अमृताचे बोल

या शब्दांना असे फार मान

होऊ नये कुणाचा अपमान

ठेवा नेहमी याचे भान......!!2!!....


शब्द अमृताचे बोल

विनयाने शोभते विद्वत्ता परी

ज्ञानाने कितीही व्हावे मोठे परी

नियंत्रण ठेवावे शब्दा वरी.....!!3!!....


शब्द अमृता चे बोल

झाले कितीही विद्वान

परी आई-वडिलांना लहान

ठेवा नेहमी त्यांचा मान.....!!4!!.....


शब्द अमृताचे बोल

प्रेम वर्षाव करा साऱ्यांना

प्रेमाने जवळ करा साऱ्यांना

शब्द अमृताचे बोल, शब्द हे पृथ्वीचे मोल...!!5!!...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational