STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

महत्वाकांक्षा...

महत्वाकांक्षा...

1 min
201

या जगी ज्यांनी केले विशेष,

ती सारी माणसं महत्वाकांक्षी,

सामान्य माणसं गुंततात,

छोट्या छोट्या गोष्टीत आंकाक्षी...


शिवरायांची महत्वाकांक्षा,

होती स्वराज्य मिळवण्याची,

अशीच माणसं ठरतात,

केंद्रीभूत विश्वाच्या सामर्थ्याची...


महत्वकांक्षेच्या पूर्तेतेसाठी,

अंगी येते खूप झपाटलेपण, 

आंकाक्षेचा करावा लागतो त्याग,

वळवाव लागतं मन...


अज्ञान दूर होण्यासाठी,

कर्मवीर अनवाणी पायाने फिरले,

पूर्ती केली महत्वकांक्षेची,

सर्व अडचणींना दूर सारले...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics