स्वाभिमान
स्वाभिमान
शिवरायांनी भूमिपुत्रांचा केला, स्वाभिमान मनातला जागा,
उफाळला तेव्हा पराक्रम, स्वराज्य मिळालं जगा
स्वतःला स्वतःबद्दलचा अभिमान, स्वत्त्वाची जाणिव असते,
स्वाभिमानी माणसं संवेदनाक्षम, प्रेरणा देण्याचं काम करते
स्वाभिमानाने मिळतो विचार,महत्वाकांक्षा वाढवतो स्वाभिमान,
स्वाभिमानी माणसं आव्हान देतात,अपमानाचा बदला अपमान
स्वाभिमानशून्य असणारी माणसं,कमकुवत व संकुचित मनाची,
स्वाभिमानीचा कणा ताठ,शपथ कधीही कुणापुढे न झुकण्याची
