जीवनात नाती
जीवनात नाती
जीवनात नाती तशी
अनेकच असतात
पण ती जपणारी लोक
फारच कमी असतात
काही नाती असतात रक्ताची
तर काही ह्रदयाची
काही नाती असतात जन्मोजन्मीची
तर काही काही क्षणापुरतीची
काही नाती असतात
केसासारखी न तुटणारी
पण वेळ आलीच तर वाकणारी
काही नाती असतात
लांबूनच आपल म्हणणारी
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी
काही नाती असतात
पैशाने विकत घेता येणारी
तर काही प्रेमाने आपलस करणारी
काही नाती असतात
न जोडता सुद्धा टिकणारी
तर काही जोडून सुद्धा तुटणारी
