माझी लेक
माझी लेक
हलकीशी हसते, अशी ती एकटक बघते
मध्येच रडते, अनं कधी बोलत बोलत झोपते
जवळ असलो तूझ्या की, वाटते वेळ संपू नये
काम करताना वाटे, एक एक दिवस कसा जाये
ते चाफेकळी ओठ, आणी त्याची अलगद हालचाल
रोखनारी तीक्ष्ण नजर, आणी गोबरे गुलाबी ते गाल
तु केलीस मांडीवर शी आणी सू, वाटली नाही आज ती घान
फक्त तुला समोर ठेऊन तुला बोलणं, वाटतं आता छान
सगळं ऐकते माझ, अनं नजरेने बोलते मला
तु असताना जवळ, अजून काय पाहिजे बाळा
तु आलीस आयुष्यात, तशी सुखाची रोवली मी मेख
माझ विश्व म्हनजे तु, लाडाची माझी लेक

