बाबा
बाबा
मरण यातना सोसतांना
आई जन्म देत असते
आपल हसू पाहत पाहत
सार विसरून हसत असते
बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र खपत असतो
शिस्त लावत आपल्या मधला
हिरवा अंकुर जपत असतो
त्याला कसलच भान नसत
फक्त कष्ट करत असतो
चिमटा घेत पोटाला
बॅकेत पैसे भरत असतो
तुमचा शब्द तो कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडे पाहत नाही
तुम्ही म्हणजे त्यांची स्वप्न
तुम्ही म्हणजे त्यांच आभाळ
तुमच्यासाठी गिळत असतो
नामुष्कीची अवघी लाळ
तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबा खचत असतो
आधार देता देता तरी
मन मारून हसत असतो
तुमच्याकडून तस त्याला
खरच काही नको असत
तुमच यश पाहूनच
त्याच पोट भरत असत
त्याच्या वेदना कुणालाही
कधी सुद्धा दिसत नाही
जग म्हणत," आई एवढ
बाबा कधी सोसत नाही."
त्याच्या वेदना आपल्याला
तशा कधी कळणार नाही
आज त्याला मागितल्या तर
मुळीच सुद्धा मिळणार नाही
एक दिवस तुम्ही सुद्धा
कधी तरी बाबा व्हाल
त्या बाळाच्या डोळ्यात
तुमच्या स्वप्नांच आभाळ पाहाल
तेव्हा म्हणाल, " आपला बाबा
खरच कधी चुकत नव्हता
आपल्यासाठी आयुष्यभर
रक्त सुद्धा ओकत होता."
