STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Classics Inspirational Others

3  

Shivani Hanegaonkar

Classics Inspirational Others

आयुष्य

आयुष्य

1 min
326

आयुष्यभर सोबत असून 

जवळ कधी बसत नाही

एकाच घरात राहून आम्ही

एकमेकास दिसत नाही


हरवला तो आपसातला

जिव्हाळ्याचा संवाद

एकमेकास दोष देवून 

नित्य चाले वादविवाद

धाव धाव धावतो आहे

दिशा मात्र कळत नाही


ह्रदयाचे पाऊल कधी

ह्रदयाकडे वळत नाही

इतक जगून झाल पण

जगायला वेळ नाही

जगतो आहोत कशासाठी

काहीच कसला मेळ नाही


क्षण एक येईल असा 

घेवून जाईल हा श्वास

अर्ध्यावरच थांबलेला

 असेल हा जीवनप्रवास

अजूनही वेळ आहे

थोड तरी जगून घ्या

सुंदर अशा जगण्याला

डोळे भरून बघून घ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics