Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mita Nanwatkar

Abstract Tragedy Classics

3  

Mita Nanwatkar

Abstract Tragedy Classics

बांधावरची बाभूळ

बांधावरची बाभूळ

1 min
539


बांधावरची बाभळ एक

सांगते अनोखी कहाणी

शेतकऱ्यांच्या संघर्षात

सजते स्मृतींची विराणी

साक्षी अविरत कष्टाची

घामाच्या सतत धारांची

थकून भागून घेतलेल्या

क्षणिक त्या विसाव्याची

काटेरी रूप जरी असले

सरपण चुलीला पुरवले

तिखट ठेच्याला सोबत

चवीला गोड डिंक दिले

झाली ती मायेचे छप्पर

वादळ,पाऊस झेलताना

बाळास दिले तीने झोके

माय खुरपणी करताना

काट्यांच्या सहवासातही

उमललेली पिवळी फुले

संकट काळात देई बळ

अन् भोवती चैतन्य खुले

सुख दुःखात साथ देत

उभी आहे बांध्यावरती

उत्कर्षाप अवघा बघता

भाळला जीव तुजवरती


Rate this content
Log in