STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Tragedy

5.0  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Tragedy

पाऊस राजा

पाऊस राजा

1 min
275

कालचा पाऊस माझ्या गावी

असा काही झाला

अन् पहाटे पर्यंत साराच गाव

पुरात वाहून गेला..


गोठ्यामध्ये गुरे वासरे

हंबरायला लागली 

बघता बघता खुट्यासकट 

पिल्लं वाहून गेली

गाईनेही रडून मोठा हंबरडा फोडला

अन् पहाटे पर्यंत साराच गाव

पुरात वाहून गेला..


ढासळल्या मोठ्या इमारती

घरे कौलारू कोसळली

पत्र्यांची होती झोपडे ज्यांची

त्यांची छप्परे उडून गेली

माती सकट तिथं तेव्हा

रक्ताचाही चिखल साचला होता

अन् पहाटे पर्यंत साराच गाव

पुरात वाहून गेला..


धो-धो बरसत होता तो

आमची आसवें आटली होती

रडून रडून काहींची तर

हाडे खिळली होती

गमवून बसला जो आपल्यांना

तो इतरांना वाचवित होता

कालचा पाऊस जणू 

आम्हाला माणुसकी शिकवीत होता

बोटांवर मोजण्या इतकाच 

आता वेळ राहिला होता

अन् पहाटे पर्यंत साराच गाव

पुरात वाहून गेला..


ओसरला जेव्हा पूर

गावाचं स्मशान झालं होतं

नाचायची जिथं मोर कधी

तिथं गिधाडांचं राज्य होतं

थांबला होता पाऊस..,आता

डोळ्यांच आभाळ फाटलं होतं

अन् हात जोडून प्रत्येक जीव

जणू साकडं घालत होतं

तूच मायबाप गड्या

आमच्या जीवाचा कैवारी

चुकलं माकल विसरून

हो रे आमचा तू वाली

'पाऊस राजा' हो आमचा तू वाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract