पाऊस कविता - दुवा
पाऊस कविता - दुवा
असा कसा रं पावसा
कहर इथे मांडला?
शेतकरी राजा माझा
पार ओरबाडूनी गेला ||१||
गेल सारं पिकपाणी
स्वप्न सारी विखुरली,
घामाची, कष्टाची त्याच्या
झोळी पण रीती झाली ||२||
नको रं असा कोसळु
ठेव जाण लेकरांची,
ऐकुनिया शिव्याशाप
आता घे दुवा तरी त्यांची ||३||
झाल गेलं विसरतो
जुपल पुन्हा कामाला,
देऊ नकोस रं दगा
अजीबात या वक्ताला ||४||