पाणी!!!
पाणी!!!
पाणी .....!!!
पाणी पाणी पाणी
आली आणिबाणी
एकवटल्या साऱ्याजणी
घेण्यासाठी पाणी
तळ विहिरीचा
गाठला पाण्याने
पाणी पातळी
खोलवर गेली आवर्षणाने
पाणी वाचवा
पाणी जिरवा
गर्जना चालली
महत्प्रयासाने
आता मात करू
पाण्यासाठी
आवर्षणाच्या प्रश्नावर
स्वप्रयत्नाने
चर खणूया डोंगर
पायासी अन
पाणी जिरवुया
आपल्या रानासी
मुबलक पाणी
रान नापीक
होईल सुपीक
देण्या मुबलक पीक
मन्त्र पाण्याचा
मनी जपुया
रानो रानी पाणी जिरवूया
वारेमाप पीक पिकवूया
पाण्याची आणीबाणी
नष्ट करूया
हातचे जल शिवाराचे
स्वप्न साकार करूया....!!!
सुजलाम सुफलाम
धरणी करुनि
भारत भूचे ऋण फेडूया
सौख्य समाधानाचे जीवन जगुया....!!!
