पाणी
पाणी
💦💦💧💦💦
जगण्यास स्वप्न आयुष्याचे गाण्यास ही जीवन गाणी
ईश्वराने दिले आपणास अमृत त्याचं नाव पाणी💦💧
पाणी...तुझी एक निराळीच कहाणी...
नेहमीच तारशी मानवास
जलसंजीवनी बनूनी 😊
रूद्र रूप धारण केल्यास
मारशीही मानवास कधी अकाल बनूनी 🌊
पावसाच्या थेंबा रुपी चातकास तारतो
पाऊस होऊन झरतो, नदीतून वाहतो, जलाशयाची थांबतो 🏞
कधी पहाटे होऊनी मोत्यांपरी
पानांवरील दवबिंदू 🌱
तर कधी आनंदाचा, दुःखाचा अश्रू बनुनी
डोळ्यातूनी ओघळतो,तृप्ततेच सुख ही देतो 😢☺️😊
तुझ्यामुळेच सर्वत्र हिरवाई फुलतात
पान फुले अन् सर्व वनराई🍃🌿☘ 🌸
कष्टकरी शेतकऱ्यांचे दुःख ही सारतो
सृष्टीचं हे सौंदर्य ही जीवापाड जपतो
आहे तुला अनेक नावे अन् रुपे
तुझ्या विना जगणे नाही सजीवास सोपे
ना धर्म ना कुठली जात तुला
मिसळेल तोची रंग तुझा
आयुष्य रुपी लेकराची आहेस जणू तू माता
जातांना या जगातूनी दोन थेंब हे गरजेचे
मोक्षप्राप्तीचा मार्ग हा जणू
जलप्राशन हे धर्माचे
एकेक थेंब तुझा आहे खूप अमूल्य
तुझ्याशिवाय जीवनाला ना कोणतेच मूल्य
बदलते हे युग आपले पाण्याची
मांडते व्यथा
प्रदूषण मुक्ती चा प्रण घेऊनी बदलूया जीवनाची कथा🙏
म्हणूनच पाणी वाचवण्याचे प्रत्येकाने पाळा तत्व पाण्याला जीवनात अमृतापरी आहे महत्व🙏🙏
