STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

पाणी

पाणी

1 min
489

जपुन वापरायचे पाणी

पाण्याविणा नसे हे जीवन

सृष्टीवरचे अमुल्य अमृत

दुर्मिळ झाले आहे संजिवन....!!


पाणी शुद्ध करी तनामनाला

का उधळतो आपण पाणी

पाणी आहे अपुले जीवन

पाणी सृजन द्रव सारीणी.....!!


थेंब-थेंब पाण्याची करू बचत

नाही तर रडू पाण्याविणा आपण

नद्या,नाले,तलाव सुकत आले

पृथ्वीवर तडफडून मरू आपण....!!


पाणी वाचवा पाणी जिरवा

मनी ध्यानी एकच नारा

तलाव,धरण अन् बंधारे बांधून

अडवून पाण्याचे नियोजन करा...!!


झाडे लावू झाडे जगवू

भगिरथ प्रयत्न सारे करूनी

ठिकठिकानी गंगेचे अवतरण

प्रगट्य संकल्पाचे तत्पर करूनी....!!


अनमोल पाण्याचे संकलनासाठी

एकजुटीने आता कार्य करू

विश्व जल दिवस आजचा

आंनदाने आपण साजरा करू....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational