पानगळ
पानगळ
पानगळ होते शिशिरात
पुन्हा नव्याने पालवी फुटते
आयुष्याच्या काही क्लिष्ट घटना
अशाच पानगळीसमान
पुन्हा नव्याने करा सुरुवात
पुन्हा पुन्हा होतात चुका
पुसून कोरी पाटी एकदा
उमटतात नव्याने नविन शब्द
अर्थाचे कधीतरी होतात अनर्थ
समजून घेऊन सारे होतात मग समर्थ
बाजू कुणी कुणाची घ्यावी
मनाची पाटी त्यासाठी कोरी ठेवावी
समोरच्याला मग दिसेल प्रतिबिंब
सत्याची अनेक रूपे
दाखवून जातील मग तयाची सरुपे
पान गळ होते शिशिरात......
