आई
आई
1 min
197
चालता चालता ठेच लागली
आई ग शब्द नकळत बाहेर पडले
त्या शब्दांनी किती वेदना झाल्या असतील तुला
तू जवळपास नव्हतीस तरी ही
तूझी आठवण सोबत होती
वेदना दुःख सारेच शब्दात
मांडता येत असे
तूझं समजावणं मनाला भावणं
आता तू नाहीस आणि शब्द ही नाहीत
पण मनातल्या गाभार्यात तूच आहेस
हे वेगळं सांगायला हवं का
कधीकधी त्या शब्दांचे भास होतात
जगण्यासाठी आवश्यक श्वास असतो
तूझ्या जाण्याने तो थांबला
म्हणजे श्वास सुरु पण जगणं कठीण
आता राहिलं ते फक्त समजूत
काढत काढत तुझ्या शिवाय जगणं
