STORYMIRROR

Khalida Shaikh

Others

3  

Khalida Shaikh

Others

बहाव

बहाव

1 min
153

नयनात भावनांचा असा कारे बहाव

 वाटले शब्दांत तुझ्या जरा अडकून तरी पहावं


मनातल्या गाभार्‍यात डोले आठवणींची नांव

शोधून ही सापडेना मला माझ्या मनाचा ठाव


जीवन हे असेच कधी धूप तर कधी छावं

अव्यक्त राहिले सारे उरले फक्त मनातील घाव


वेदनांचे ही असते कारे वेगळेच एक गाव

अश्रूच असतील कदाचित तयाचे दुसरे नाव


भेटता उलगडले असते मनातील सारे भाव

दूरस्थ तू नको करुस बहाणा आणू नको उगाचच आव


Rate this content
Log in