सरी
सरी
झिरझिर झिरझिर बरसल्या
अवचित आज ह्या सरी
तुझ्या आठवांच अधिराज्य
असतं सदैव माझ्या मनावरी
आभाळभर पसरलेला असतो
ढगांचा हा कापूस
अश्रूंचा हा झरा मग निसटतो
अलगद होता तुझा आभास
इंद्रधनुष्यापरी या तुझ्या प्रेमाच्या छटा
किनार्यावर जश्या आदळती परतीच्या लाटा
तू दूरवर दिसणारं एक क्षितिज
तूझपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वाटा

