पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
पहिल प्रेम झालं झाली नजर भेट
शब्दांनी ही मग धरला अबोला
चोरुन भेटण्याचा योग मला आला
मी बावरी होऊन फिरते तुझी राधा
जपशील ना रे प्रितीचा हा नाजूक धागा
तुझ्या ओठांची मी मग होईन बासरी
गीत त्यातून ऊमलतील बरसतील मग सरी
तुझी माझी प्रित मग फुलेल
सुगंध तयाचा दरवळेल आसमंती
तुच माझा आयुष्याचा नाविक
तुझ्या विना मी मी न रहाते
जळीस्थळी काष्टी मी तुलाच रे पहाते
स्वप्न कळीला तू अलगद फुलवावेस
आयुष्याच्या या प्रवासी प्रितीस तू बहरावेस

