STORYMIRROR

Khalida Shaikh

Others

3  

Khalida Shaikh

Others

माझी शाळा

माझी शाळा

1 min
184

भग्न जरी उभी मी आज ईथे

शिकून गेले येथूनच सारे पुढे

आवारातच खेळ रंगत असे

ते भास आजही मज होतात असे

चिंचा कैर्‍या आवळे आणि बोरे

सदैव नेम धरून पाडत ही पोरे

कौले फोडून हळूच लपून पाहती

कसलीच नाही त्यांना वाटे भीती

पुन्हापुन्हा मी भावनांना घालून आळा

वाट पहातेय चिमुकल्यांसाठी ही शाळा


Rate this content
Log in