एक क्षण
एक क्षण
एक क्षण प्रेमाचा
एक क्षण मोहाचा
एक क्षण संयमाचा
एक क्षण निग्रहाचा
एक क्षण विरहाचा
एक क्षण प्रेमाचा
अळवावरील थेंबासारखा
अलगद निसटून जाणारा
तरीही तुझ्या माझ्या
नात्यातील प्रदीर्घ ओलाव्याचा
एक क्षण प्रेमाचा
तुझ्या माझ्या मैत्रीचा
आसमंतात भरुन ऊरलेला
कधीकधी ही न सरलेला
एक क्षण प्रेमाचा

