STORYMIRROR

Khalida Shaikh

Comedy

3  

Khalida Shaikh

Comedy

गणित

गणित

1 min
147

नात्यांच हे गणित मला

कधीच नाही कळलं

नकळतच मैत्री साठी

मन मात्र माझं वळलं


आमचं गणित होत

मुळातच कच्च

अंकगणित तर अंकगणित

बिजगणित तरी कुठं होतं पक्क


अधिक वजा केलं

 तरं होतं म्हणे वजा

वजा वजा केलं की

होत मात्र अधिक


ह्यात कसली हो मजा

ही तर नक्कीच सजा

नात्यात हा ताळा करुन पाहिला

कधीच बसला नाही ताळमेळ

    

मैत्रीच्या रेशमी गाठी

करुन पाहिला मी टाळा

अधिक अधिक अधिकच राहिलं

वजा वजा अधिकाधिक

वाढतच गेलं वाढतच गेलं


अधिक वजा करुन पाहिलं

तरी मैत्रीत चिन्ह अधिकच राहिलं

आकड्यांशी आमचा कधीच

बसला नाही हो मेळ

अविरत मी शब्दांशी केला खेळ


शब्दांवर आमचं आहे प्रेम

अपेक्षित मात्र नाही

कुणी शब्दांची करावी

लयलूट आम्हासाठी


ओंजळीतून फुलं दिली

जरी प्रेमाने कोणास

भरून रहातो सुगंध

आपल्याच ओंजळीत

       

नात्यांच हे गणित मला

कधीच नाही कळलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy