पांग कसे फेडू मी
पांग कसे फेडू मी
पांग कसे फेडू मी हे
रक्षी कशी जन्मभूमी
काढू कसा फितुरांशी
गाजवू ही रणभूमी. !१!
छत्रपती शिवराय
वीर हे तुम्हा संगती
नाही दिसे मर्द आज
स्वराज्यास प्राणज्योती. !२!
बाटल्या माय भगिनी
कापती कसाया गाय
उरला ना वाली कोणी
सदा खडा रक्षणाय. !३!
बघा कसे कर्मभष्ट
वाऱ्यावर धर्म सोडी
बाटे हिंदू रात्रंदिन
आया रडे मोकलून. !४!
घ्याहो शिवा अवतार
पुन्हा फाडा अफजल्या
तुम्ही वाचवू शकता
ह्या रण जन्मभूमीला. !५!
