पाखरू
पाखरू
तू गंध फुलांचा
तू गंध फुलांचा
मज मोहून जातो
मी वाऱ्यापरी तुझ्यात वाहून जातो
तू ऋतू पावसाळी
मी भिजून जातो तू वाहणारी नदी मी सागरापरी वाट पाहतो
तू मखमली चादर
मी स्वप्न चांदण्यात राहतो
तू निःशब्द पाखरू
मी नजरेत त्या मज शोधतो

