तू
तू
धुंदीचा छंद तू, बहरलेला गंध तू
रात्रीची सोबती अन्, शहाऱ्याचा भेद तू
थरथरता देह हा, तू तयाची स्पंदने
ओल्या ओठावर सांडलेले चांदणे
कामाची कामिनी, अधीर सखे साजणी
बावरते मन खुळा, कैफिची यामिनी
नजरेची लाज ही अंगावर ओघळली
मिलनाचा क्षण अन् मिठीत रात थांबली
रात्र ज्वर सरसाल, प्रेम बहर मोहरला
अर्धरात मोहक हि , चांद नभी बावरला

