प्रेम
प्रेम
दूर तुला करताना मन थाेडं घट्ट केलं
पदराला सैल न् मनाला थाेडं माेठं केलं
घे भरारी तू माेकळे पणाने
मायेचे माझ्या कायम छञ तुझ्यासवे
पंखांवर स्वताच्या विश्वास तू ठेव
मनगटात बळ न् मनात आस वेच
परतून तू येताना पुन्हा मी तिथेच मिळेन
तुझ्या माझ्या स्वप्नांमध्ये मी स्वताला रमवेन
वाट पाहताना मला आेढ तुझ्या येण्याची
राञीस राञ जाेडून मन आणखी घट्ट हाेण्याची
माझं तुझ आकाश एक
त्यात व्यापला तू एक

