अत्तर माया
अत्तर माया
अत्तर फाया,
तित्तर काया!
लावा पिंजर,
ललाटी राया!
हा जरतार,
लाल पदर!
कातरवेळ
ऊरी सागर!
करू द्या माया,
प्रित जपाया!
लावा मुश्क,
खस, बेलीया!
कनोजी अर्क,
कांचन वर्ख!
निळं अंबर,
मिठीत गर्क!
सुरंगी, पान,
माती, चंदन!
घालाया तुम्हा
अभ्यंगस्नान!

