त्या वाटेवर
त्या वाटेवर
एकली मी थांबली वाटेवरी त्या
बासरी ती वाजली वाटेवरी त्या
चोरट्या भेटीत या रातीत न्हाऊ
काजवे का नाचली वाटेवरी त्या
हासले खोटेच होते हारतांना
तूज साठी हारली वाटेवरी त्या
वासुदेवा मोरपंखे झाड ना रे
प्रेम लीला चालली वाटेवरी त्या
सोबतीला कृष्ण आहे चालतांना
मीच त्याची शामली वाटेवरी त्या

