STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

मनास तुझ्या कसे कळावे

मनास तुझ्या कसे कळावे

1 min
221

मनास तुझ्या कसे कळावे

दुःख माझ्या विरहाचे

आठवणीत काय सांगू

हाल माझ्या हृदयाचे


लिहिले नशिबात माझ्या

विरहात तुझ्या तळमळणे

नको ते विचार मला

नको ते तुझ्यावीणा जिने


पेटत राहतो अंगार तुझ्या

आठवणींचा मनात माझ्या

शेकत राहतो मन माझे मी

विरहातल्या उन्हात तुझ्या


जळून जळून राख झाली

आहे मनाची माझ्या

सांग कशी काटू रात मी

फक्त आठवणीत तुझ्या


काय बोलू? कोणाला सांगू?

दुःख माझ्या मनातले

कसे कापू दिवस मी हे

विरहात तुझ्या अंधारलेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance