राधा मी बावरी.........
राधा मी बावरी.........
*रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते..............*
या ओळीतूनच तू जाणावे मम अंतरास.........!!
हे मनमोहन, तूच माझा निर्मळ श्वास......... !!
जीवास लागलेली वेडी आस.........!!
पावनप्रीतीचा प्रेममयी विश्वास............!!
मिलनाची ओढ लागलीया जीवास...........!!
हे मुकुंदा,तव दर्शन हा एकच वेडावला ध्यास..........!!
तुझ्या संगे सजलेली प्रीतमयी रास........!!
सहस्त्र चांदण्यात लखलखत्या दिव्यांची आरास.............!!
पावन प्रणयाने बेधुंद होऊनी मोहविले या आसमंतास...............!!
हे मुरलीधर, वेणूचा तो मंजूळस्वर स्पर्शून तुझ्या अधरास.........!!
भाग्यवान मी होऊनी तव प्रिया तरीही काय कारण विरहास........?
क्षण ते सुगंधी वृंदावनातील अलौकीक तेज अन् प्रीत मात देई तिमिरास.............!!
छळू नकोस तु असा मला रे का झुरणी लागे या मनमयुरास.............?
मनमोहन-मेघःश्यामा दरवळ तुझा,नितांतसुंदर , तव रूप मनोहर साठवूनीया मम हृदयास.............. !!
अक्षरवेलींची फुले उमलली बहरवूनीया कुंजवनास........!!
दरवळ उठला चहूकडे तो पायघड्या घालण्या आतूर मी तुर्तास.............!!
प्राणसखा, तु काळीज माझे नको अंतर देऊ अंतरास..........!!
अनेक वादळे उसळूनी लाटा कसे पार करावे भवसागरास..........?
जीव गुंतला तुझीया चरणी दे एक भेटीचा क्षण मम तु खास............!!
हे श्रीरंगा, जीव लावूनी मजला नको सोडू अधांतरी या जीवास...........!!
कुंजवनातील उदासीन मरगळलेल्या कुंद कळ्यांना तव स्पर्शाने नेई बहरास...............!!
अधीर मनाची समजून व्यथा करी तृप्त या प्रीत पाखरास...............!!

