ती, तो आणि पाऊस...
ती, तो आणि पाऊस...
ती..
पावसाच्या या सरींना सवत म्हणू का माझी
माझ्या आधी ती कशी तुझ्यावर बरसली
तो हक्क माझा आहे हे का ती विसरली?? 😠
तो..
पावसाला मीच सांगितले तुझ्या सोबतीने यायला,
वेडावलेला तो तुला पाहताच बिथरला,
तोच राग धरून सरींवर सरी बरसल्या,
त्या दोघांच्या भांडणात तु नको होतं माझ्यावर चिडायला...😒
संधी साधून बोचरा वाराही मग,
खोड्या काढू लागला..
जणू काही सांगत होता त्याला,
वेड्या घे आता कुशीत तिला..
या सगळ्या नादात ती चांगलीच गारठली,
विसरून सर्वकाही त्याच्या मिठीत सामावली..
क्षणार्धात आता तोही पाघळला,
मिठीत येता तिच्या तोही सुखावलाा..
आकाशी पाहून त्याने हळूच डोळा मारीला
पाहून यांचा खेळ सारा आसमंत बहरला...

