STORYMIRROR

SHUBHANGI SHINDE

Romance Others

3  

SHUBHANGI SHINDE

Romance Others

नवी सुरूवात...

नवी सुरूवात...

1 min
199

आज तुझ्या आठवणीत चिंब भिजावेसे वाटले

बघ ना त्या पावसानेही बरोबर ओळखले..


मनीच्या भावना आता अश्रुंवाटे वाहतील,

भिजताना पुन्हा एकदा सरींमुळे लपून जातील...


असेही कोणास वेळ आहे आपलं अंतर्मन जपण्यात,

जो तो इथे आपल्याच व्यापात..


कुणास ठाउक हे आभाळही कदाचित रडत असेल

त्याचही असंच कुणीतरी हरवलं असेल..


मिठी मारुन आभाळाला सांगायचे आहे,

इथे मी तुला आणि तु मला एकमेव आधार आहे..


जे गेले त्यांच्या आठवणीत किती दिवस झुरायचे

अशातच मग कशाला दुःख कवटाळत बसायचे?


आजपासून तुझ्या माझ्या गोड आठवणी निर्माण करु,

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, चल आज नव्याने सुरूवात करू..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance