वाट तुझी पाहताना
वाट तुझी पाहताना
वाट तुझी पाहताना
चंद्र झाला दिसेनासा
तारे आले सोबतीला
जीव झाला येडापिसा ||1||
वाट तुझी पाहताना
दिवस रात्र एकच
डोळे माझे पाणावले
तुझ्या भेटीची आसचं ||2||
वाट तुझी पाहताना
तान भूक न लागे
गेलो सारे विसरूनी
मज ध्यास तुझा लागे ||3||
वाट तुझी पाहताना
मन कासाविस झाले
तुज पाहताच क्षणी
मन हे बावरे झाले ||4||
वाट तुझी पाहताना
अश्रु आले ओघळून
भिजली माझी लेखणी
आभाळ आले भरून ||5||