STORYMIRROR

Pandit Warade

Romance Others

3  

Pandit Warade

Romance Others

माझा मी न उरलो

माझा मी न उरलो

1 min
242

प्रभात समयी तिला पाहता, मनात मोहरलो

उठला रोमांच देही, धुंदलो, माझा मी न उरलो ।।धृ।।


गंध धुंद नि कोमल नाजूक स्पर्श तिचा होता

खुशीत येऊन शीळ घालतो मनातला तोता

बनून तेव्हा धुंद विहंग मी अवकाशी फिरलो

उठला रोमांच देही, धुंदलो,माझा मी न उरलो ।।१।।


तिची डाळिंबी ओष्ठ पाकळी खुलते बोलावया

शब्द अधिर तिचे होती मुखातून बाहेर यावया

गाल चुंबीती, काळे कुंतल, ते बघून मी झुरलो 

उठला रोमांच देही, धुंदलो, माझा मी न उरलो ।।२।।


डौलदार तिची चाल जणू चालते गजगामिनी

क्षणामध्ये ती बनते हजारो हृदयांची स्वामिनी

नयनबाण ऊरी घुसता स्वतःचे मीपण विसरलो

उठला रोमांच देही, धुंदलो, माझा मी न उरलो ।।३।।


कर कोमल तिचा हाती येता मोद ऊरी भरतो

भासे स्वर्गसुखाच्या डोही मस्ती मध्ये विहरतो

झंकारल्या ऊरी असंख्य तारा पुरता विरघळलो

उठला रोमांच देही, धुंदलो, माझा मी न उरलो ।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance