अर्थ
अर्थ
तुझ्याजवळ येण्याचा
मज नव्हता अर्थ ठाऊक
तू केलास पुढे हात
अन् झाले मी भावूक
थरथरत्या हातात होती
फुले दोन गुलाबाची
हातात हात घेता
चमकली काया फुलांची
सावरले स्वतःला जेव्हा
सुटला हातातून हात
पाकळ्यांच्या वर्षावात
होते आनंदाने मी नहात
गडबडून गेले होते जेव्हा
नजर त्याच्याशी भिडली
सुकलेल्या पाकळ्यांची तेव्हा
मातीवर माया जडली

