प्रेमाचं गोंदण
प्रेमाचं गोंदण
माझ्या आयुष्याला सख्या तुझ्या प्रेमाचं बंधन.
तुझ्या गहिऱ्या डोळयांवर माझ्या ओठांचं गोंदण.
तू नुसते पाहिले जरी मला प्रेम भरल्या नजरेने,
रिक्त रिक्त मी होत जाते मनाने अन् तनाने.
तू यावास सख्या धुंद पाऊस होऊन,
मी चिंब चिंब भिजत राहीन फ़क्त तुझी होऊन.
तू टीपुन घे हे अलवार पाण्याचे मोती,
अंग अंग शहारा फुलेल तू घेता मला चुंबून.
मनाच देहाच मिलन घडेल त्या स्पर्शातून.
श्वास माझा थरथरेल,जीव ही हूरहुरेल,
उष्ण श्वास तुझे जाणवतील उबदार तुझ्या मिठीतून.
बोलू नकोस काही सार काही उमजून येईल.
पाठी वर माझ्या जेव्हा बोटांनी नक्षी उमटवशील.
ख़ूप सुंदर आहे तुझ प्रेमाच हे देण.
उधळून टाकावं तुझ्यावर माझं सारं जीणं.

