STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

पाहू रे किती वाट

पाहू रे किती वाट

1 min
11.4K

अष्टाक्षरी


मन झाले हो चिंतित

आता शिवार तापलं

लई भेगाळली भुई

द्येवा कवा गंधाळलं? (1)


वृक्षवल्ली का तोडली?

ऱ्हास पर्यावरणाचा 

वसुंधरा झाकोळली

दोष सारा मानवाचा (2)


लागे नजर आभाळी

जाती नक्षत्रे कोरडी 

नद्या विहीरी आटल्या

पिके पडली उघडी (3)


कर्ज होय पिकापायी

काय करु उमजेना?

पीक नाही उगवलं

कसे सांगावे सुचेना? (4)


फक्त एक मार्ग दिसे

मला आता सुटण्याचा

फास घेताच सुटेल 

प्रश्न आयुष्यभराचा (5)


गुरेढोरे भुकेलेली

पोरं चेहरे टाकून

अशामधी मृत्युसुद्धा

कसा घेईल वेढून? (6)


असे जगणे-मरणे

देवा अवघड झाले 

कर वर्षाव रे आता

प्राण कंठाशीच आले (7)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy